Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हत्येची धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक, पोलिस यंत्रणा सतर्क

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांविरोधातील सर्व धमक्यांची दखल घेतली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे आणि इतर बाबींवर पूर्ण लक्ष देत आहोत. काल मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे,” असे सांगताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. फडणवीस यांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत तपशील शेअर केला नाही, पुणे पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हत्येचा “प्लॉट” असल्याचा दावा करून पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदवला होता. या आरोपीने पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एका हॉटेलमधून कॉल केल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहिती राज्य गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यांना जिवे मारण्याचे पत्र तसेच मंत्रालयात निनावी फोनदेखील आल्याची ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच तपास सुरू करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर महाराष्ट्र पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील वर्षा, नंदनवन तसेच ठाण्यातील खासगी निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत