मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांनी विष प्राशन केले. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज ठाकरेंच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड
भंडारा : एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीलेवाडा येथे घडली आहे. . यात तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय […]
नि:स्वार्थी मुख्यमंत्री ; एकाचवेळी पाच सरकारी बंगल्यांवर कब्जा; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई: ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर नवा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी पाच सरकारी बंगले वापरण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्रीपदावरील ‘निस्वार्थी व्यक्ती’ एकाचवेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, अशी खोचक टिप्पणी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले […]
धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान
परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]
T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; 16 संघाचा रणसंग्राम, जाणून घ्या सामन्यांचं शेड्यूल…
पुणे : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय […]
BMW चा वेग दाखवण्यासाठी फेसबुक लाइव्ह, काही क्षणातच भीषण अपघात, चौघांचा जागीच भयंकर मृत्यू
बिहार : पूर्वांचल एक्स्प्रेसवर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा अपघात झाला असून, काही दिवसांपूर्वी रस्ता खचल्याने येथे मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आलेली होती. डॉ. आनंद कुमार हे त्यांचा चुलत मेहुणा […]
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका! अमूलकडून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
मुंबई : अमूलने फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. अमूलने दुधाच्या दरात केलेली ही तिसरी वाढ आहे. कंपनीने मार्चमध्ये आणि ऑगस्टमध्ये देखील त्यांच्या दुधाच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने शनिवारी अमूल ब्रँड अंतर्गत आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फुल […]
हंगर इंडेक्समध्ये भारताची 107 व्या स्थानावर घसरण; शेजारी देशांपेक्षा भारतात जास्त उपासमार
ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ : यावेळी ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच हंगर इंडेक्समध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अगदी नेपाळपेक्षाही भारतात उपासमार जास्त आहे. आकडेवारी सांगते की भारतात उपासमार झपाट्याने वाढली आहे आणि भारताची क्रमवारी आणखी खालावली आहे. भुकेशी संबंधित या क्रमवारीत भारताची आणखी सहा स्थानांनी घसरण झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या क्रमवारीनुसार, भारत […]
पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक – जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक मानले आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या निवेदनात काँग्रेसच्या प्रचार समितीच्या रिसेप्शनमध्ये डेमोक्रॅटिक अध्यक्षांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला. बायडेन म्हणाले, “मला वाटते कदाचित जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे, पाकिस्तान. कारण त्यांच्याकडे कोणत्याही सामंजस्याशिवाय अण्वस्त्रे आहेत.” अमेरिकेच्या अध्यक्षांनी रिसेप्शनमध्ये रशिया-युक्रेन संघर्ष आणि त्याचा जगावर कसा परिणाम […]










