Maratha kranti morcha coordinator ramesh kere suicide attempt
महाराष्ट्र

मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांनी विष प्राशन केले. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. हा मराठा क्राती मोर्चासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान या घटनेआधी रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडली होती. मी आतापर्यंत मराठा बांधवांसाठी लढत आलो. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. माझं काम प्रामाणिक असल्यामुळे अनेकदा त्याची दखल घेण्यात आली. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे माझी बदनामी झाली असं केरे यांनी म्हटलं, आणि त्यानंतर त्यांनी लाईव्हमध्येच विष प्राशान केलं. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत