Drug trafficking gang busted in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त

पुणे : पुणे शहरामध्ये मेफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेकडुन करण्यात आला आहे. आरोपींना जेरबंद करून एकुण 3,63,900/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत […]

17 motorcycles seized from bike thief in red light area
पुणे महाराष्ट्र

पुणे : रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त

पुणे : पुण्यात रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस अंमलदार ना. वैभव स्वामी व पो. ना. प्रविण […]

If a woman is beaten by her in laws, her husband is responsible for her injuries - Supreme Court
देश

महिलांच्या कपड्यांवरून आक्षेप घेणे असमर्थनीय, प्रत्येकाला हवे ते परिधान करण्याचे स्वातंत्र्य – केरळ उच्च न्यायालय

केरळ : केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी निरीक्षण केले की महिलांनी परिधान करण्यासाठी निवडलेल्या कपड्यांवर आधारित आक्षेपार्हता न्याय्य ठरू शकत नाही आणि त्यांच्या पोशाखाच्या निवडीवर आधारित महिलांचे वर्गीकरण करणारे नियम सहन केले जाऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी अधोरेखित केले की प्रत्येकाला देशाच्या कायद्याच्या अधीन राहून हवे ते परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला देशाच्या कायद्यांच्या […]

Harry Potter fame actor Robbie Coltrane has passed away
ग्लोबल मनोरंजन

हॅरी पॉटर फेम अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचं निधन

स्कॉटलंड : हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका साकारणाऱ्या रॉबी कोल्टरेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेनयांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या कारणामुळं निधन झालं हे त्यांनी सांगितलं नाही. १९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र शैक्षणिक

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर; फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे 13 हजार 787 विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आली. या परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी हितासाठी फेरपरिक्षा घेण्यात आली, या तंत्रनिकेतनच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये 13 हजार […]

Minister Eknath Shinde
अहिल्यानगर महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर […]

Chief Minister Eknath Shinde's tribute to veteran writer Manohar Mhaisalkar
महाराष्ट्र

उमदा साहित्यव्रती हरपला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्‍हैसाळकर यांना श्रद्धांजली

मुंबई : ‘मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष मनोहर म्‍हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मनोहर म्‍हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या […]

Shashikant Patangrao Ghorpade's body found in neera river
महाराष्ट्र सातारा

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला, दोन दिवसांपासून होते बेपत्ता

सातारा : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान, NDRF च्या पथकाला नीरा नदीपात्रात शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या आता या प्रकरणाचं गुढ वाढलं आहे. पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी […]

Terrible tractor-trolley accident in Daund, 3 women killed and 5 injured
पुणे महाराष्ट्र

दौंड तालुक्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, 3 महिलांचा मृत्यू तर 5 महिला जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यात ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. ज्यामध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील रावणगाव येथे टोमॅटोने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली काढत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या […]

Ban on international passenger flights
देश

मॉस्कोहून दिल्लीला आलेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, बचाव पथकाकडून विमानाची तपासणी

दिल्ली : मॉस्कोहून दिल्लीला आलेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच काही क्षणातच बचाव पथक घटनास्थळावर पोहोचले. प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11.15 वाजता मॉस्कोहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक SU 232 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी मिळाली. फ्लाइटमध्ये 386 […]