The Supreme Court
कोरोना देश

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करा, पण त्याआधी…

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही सल्ले दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने लस खरेदी करण्यासंदर्भातील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा असंही म्हटलं आहे. नाहीतर हे संविधानातील कलम २१ चं उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. वृत्तानुसार, […]

Supreme Court To Issue Notice To Centre government about corona situation
कोरोना देश

देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, लॉकडाऊन आणि औषधांचा पुरवठा या चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं कि, या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय […]

More than 50 per cent of Supreme Court employees are corona positive
देश

सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]

Supreme Court refuses to hear Parambir Singh's petition
देश महाराष्ट्र

अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर खळबळ माजली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे आपली सीबीआय चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख […]

Rheas FIR against Sushant's sister Priyanka will not be quashed
देश मनोरंजन

ब्रेकिंग : सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंकाची सुप्रीम कोर्टात धाव, FIR रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तिच्याविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. 7 सप्टेंबर 2020 रोजी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरूद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिबंधित असलेली औषधे […]

Supreme Court refuses to hear Parambir Singh's petition
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना तुम्ही याप्रकरणी हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करत त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी […]

center to supreme court the content of the ott platform is being monitored
देश

नवीन नियमांनुसार OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नियंत्रण ठेवत आहोत, केंद्राचे सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘ऍमेझॉन प्राइम’ सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नजर ठेवून असल्याचे प्रतिपादन केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले की नवीन नियमांनुसार OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नियंत्रण ठेवले जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल त्यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, ज्यात खासदार आणि आमदार देखील सहभागी होते. केंद्राने म्हटले […]

relief to the central government, the SC refuses to intervene in the loan moratorium policy
अर्थकारण देश

मोठी बातमी : लोन मोरेटोरियम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

लोन मोरेटोरियम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना कर्ज स्थगिती प्रकरणात आदेश देण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की वित्तीय धोरणांचे प्रकरण केंद्र सरकार आणि आरबीआयच्या अखत्यारीत आहे. आर्थिक धोरणांच्या निर्णयावरील न्यायालयीन पुनरावलोकनास मर्यादा आहेत. व्यापार आणि वाणिज्य या शैक्षणिक बाबींवर कोर्ट चर्चा करणार नाही. आम्ही ठरवू शकत […]

Parambir Singh's petition to be heard in the Supreme Court on March 26
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर 26 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिस खात्यात “पैसे वसूली योजना” चालविल्याच्या आरोपाखाली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट 26 मार्च रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारमधील अन्य काही ज्येष्ठ नेते यांना 17 मार्च रोजी […]

Param Bir Singh moves SC seeking probe against Anil Deshmukh
महाराष्ट्र

ब्रेकिंग : परमबीर सिंह यांची अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. एकीकडे विरोधी पक्ष राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, आता मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग […]