Param Bir Singh moves SC seeking probe against Anil Deshmukh
महाराष्ट्र

ब्रेकिंग : परमबीर सिंह यांची अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकीकडे विरोधी पक्ष राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, आता मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे.

परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की त्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी सीबीआयमार्फत व्हायला हवी. याशिवाय ट्रान्सफर पोस्टिंगबाबत अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही तपासले पाहिजेत, जेणेकरून सर्व सत्य बाहेर येईल, असे आवाहन परमबीर सिंह यांनी केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत