नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावत नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अॅड. कुश कार्ला यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन […]
टॅग: Supreme Court
महिलेला सासरी मारहाण झाल्यास तिच्या जखमांसाठी पतीच जबाबदार – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कि, सासरी महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर तिच्या जखमांसाठी तिचा पतीच जबाबदार असेल. गेल्या वर्षी जून महिन्यात एका महिलेनं लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पती, सासरे आणि सासू यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप महिलेनं केला […]
मराठा आरक्षणाबाबत पुढील सुनावणी १५ मार्चला, सर्वोच्च न्यायालय पाठवणार सर्व राज्यांना नोटीस
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यासंदर्भात आजपासून (८ मार्च) सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली होती कि, […]
अवनी वाघिण शिकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
अवनी वाघिण शिकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील अधिकाऱ्यांवर अवमान प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अवनी वाघिणीला नरभक्षी ठरवून तिची शिकार करताना वनविभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून तत्कालीन प्रधान सचिव विकास खरगे आणि मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्यासह १२ अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात […]
मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा
मुंबई : येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बैठक घेतली. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या सुनावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. येत्या ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सुनावणीबाबत सर्व मुद्यांची आजच्या बैठकीत समीक्षा […]
मोठा दिलासा : बँका जबाबदारीतून पळ काढू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने RBI ला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
बँका त्यांच्या लॉकर सुविधेच्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. यासह त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) 6 महिन्यांत या संदर्भात नियम बनवण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायमूर्ती एम.एम. शांतनागौदर आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की जागतिकीकरणाच्या युगात बँकिंग संस्थेने सामान्य माणसाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान व्यापले आहे. देशांतर्गत […]
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]
पोक्सो कायद्याबाबत ‘त्या’ वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी
नवी दिल्ली : पोक्सो कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला कपडे न काढता ‘स्किन टू स्किन’ केलेला स्पर्श लैंगिक गुन्हेगारीच्या श्रेणीत येत नाही असा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज (१० फेब्रुवारी) सुनावणी केली. दरम्यान, कोर्टाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या […]
ब्रेकिंग : कोरोनामुळे UPSC परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त संधी
कोरोनामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना अतिरिक्त संधी देण्यास यूपीएससी (UPSC) ने मान्यता दिली आहे. याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्या उमेदवारांना CSE-2021 मध्ये आणखी एक संधी देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे २०२० च्या परीक्षेची शेवटची संधी होती.
मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीचा कालावधी सुप्रीम कोर्टाने निश्चित केला असून 8 ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे कि, जर ८ मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नसेल तर […]









