क्रीडा

IPL 2020 : मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा १० विकेट राखून दणदणीत विजय

सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली आणि दिमाखात प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्ले ऑफ फेरीची पहिली मॅच ५ नोव्हेंबर रोजी आहे. ही मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत रंगणार आहे. तर दुसरी मॅच ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीत होणार आहे. Match 56. […]

IPL 2020 : Mumbai vs Delhi, Bengaluru vs Hyderabad
क्रीडा

IPL 2020 डबल हेडर : आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३.30 वाजता मैच, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात ७.30 वाजता मैच

आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]

Actress Malvi Malhotra
मनोरंजन मुंबई

मुंबईत अभिनेत्रीवर चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. […]

Shocking: Sword attack on a police officer
महाराष्ट्र

धक्कादायक : गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

अंबरनाथमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बाळू चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात […]

Mumbai and Chennai
क्रीडा

IPL 2020 : चेन्नई विरुद्ध मुंबईचा १० विकेट राखून विजय

IPL २०२० : आयपीएलच्या ४१व्या मॅचमध्ये चेन्नई सपुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ रन करून मुंबई इंडियन्सलला ११५ धावांचे आव्हान दिले. चेन्नई सुपरकिंग्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड शून्यावर तर फाफ डू प्लेसिस १ […]

Fire breaks out at a mall in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत सिटी मॉलमध्ये आग, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉलला आग लागल्याची माहिती मिळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मॉलमधील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यासोबतच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिटी सेंट्रल मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग […]

Avi Kadam
क्रीडा महाराष्ट्र

सचिन तेंडुलकरने कोरोनामुळे गमावला सर्वात जवळचा मित्र; ट्वीट करुन दिला आठवणींना उजाळा…

मुंबईः कोरोनाचा तडाखा क्रिकेट जगतासाठी आदरणीय असलेल्या मास्टरब्लास्टर सचिनला बसला. कोरोनामुळे सचिनने त्याचा अतिशय जवळचा मित्र गमावला. सचिन तेंडुलकरने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनामुळे मित्र गमावल्यामुळे सचिन प्रचंड दुःखी झाला. भावूक होत सचिनने ट्विटरवर मित्राविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. सचिन ट्वीटमध्ये म्हणतो, ‘माझा प्रिय मित्र अवी कदम याचे निधन झाले. शाळेच्या दिवसांपासून अवी […]

Mumbai Local will start for women
मुंबई

मुंबई लोकल १७ ऑक्टोबर पासून महिलांसाठी होणार सुरु

मुंबई लोकल महिलांसाठी सुरु होणार आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार […]

North Konkan including Mumbai and Thane heavy rains, red alert issued
महाराष्ट्र मुंबई

मुंबई व ठाण्यासह उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रेड अलर्ट जारी

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून मुंबई रडारने टिपलेली ताजी दृष्ये लक्षात घेता संपूर्ण उत्तर कोकणवर अतिवृष्टीचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागानेही मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत आजसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं […]

Beware of those who walk in public places without masks
मुंबई

विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांनो आता व्हा सावधान

मुंबई : योग्य प्रकारे ‘मास्क’ परिधान करणे, हा कोरोनास प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. मास्क वापरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर २०० रुपये एवढा दंड आकारला जात आहे. ही दंडात्मक कारवाई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई पोलीस दल, […]