मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून मुंबई रडारने टिपलेली ताजी दृष्ये लक्षात घेता संपूर्ण उत्तर कोकणवर अतिवृष्टीचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागानेही मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत आजसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे
भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं ट्विट केलं आहे. ‘अत्यंत महत्त्वाचे’ असे नमूद करत त्यांनी मुंबई आणि ठाणेकरांना सतर्क केले आहे. सॅटेलाइट आणि रडारने टिपलेले ताजे चित्र लक्षात घेता उत्तर कोकणसाठी आधी जो ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला होता त्यात बदल करण्यात येत आहे. आज मुंबई व ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात येत आहे. नागरिकांनी या काळात जास्तीत जास्त सतर्कता बाळगावी, असे होसाळीकर यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. होसाळीकर यांनी सॅटेलाइट इमेजही या ट्वीटसोबत पोस्ट केली आहे.
अत्यंत महत्वाचे Very IMP
With latest Satellite/Radar observations, Entire North Konkan is updated to Orange Alert with Raigad Red Alert & 15 Oct entire North Konkan is on Red Alert including Mumbai Thane.
Very severe convection is being observed.Take max precaution
RMC Mumbai pic.twitter.com/jA39ur876n— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 14, 2020
हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई व ठाण्यात पालिकेचे आपत्कालीन विभाग स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.




