मुंबई : जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद […]
टॅग: heavy rains
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3501 कोटी रुपयांची मदत
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत […]
अतिवृष्टीग्रस्त भागातील 14 हजार 480 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
मुंबई : राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान […]
मोठी बातमी! राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण […]
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यातच आता कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. गोवा-करमली येथील बोगद्यात दरड कोसळली असून सकाळपासून कर्नाटक-केरळमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर […]
महाराष्ट्रात वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा करावा- प्रकाश आंबेडकर
परतीच्या कोसळलेल्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, त्याबरोबरच व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे. […]
आज मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता
आज (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने […]
मुंबई व ठाण्यासह उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रेड अलर्ट जारी
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून मुंबई रडारने टिपलेली ताजी दृष्ये लक्षात घेता संपूर्ण उत्तर कोकणवर अतिवृष्टीचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागानेही मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत आजसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं […]
अतिवृष्टीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे. जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता […]