Heavy rains disrupt Konkan Railway
महाराष्ट्र रत्नागिरी

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती

रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यातच आता कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. गोवा-करमली येथील बोगद्यात दरड कोसळली असून सकाळपासून कर्नाटक-केरळमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. काही गाड्या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रेल्वे केव्हा पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून नजिकच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. नद्यांनी पाणी पातळी ओलांडली असल्यानं किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस, नगरपरिषद प्रशासन सतर्क असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत