Mumbai and Chennai
क्रीडा

IPL 2020 : चेन्नई विरुद्ध मुंबईचा १० विकेट राखून विजय

IPL २०२० : आयपीएलच्या ४१व्या मॅचमध्ये चेन्नई सपुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ रन करून मुंबई इंडियन्सलला ११५ धावांचे आव्हान दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चेन्नई सुपरकिंग्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड शून्यावर तर फाफ डू प्लेसिस १ धाव करुन बाद झाला. अंबाती रायुडू २ धावा करुन आणि नारायण जगदीसन शून्य धावा करुन बाद झाला. धोनी १६ तर रविंद्र जाडेजा ७ धावा करुन बाद झाला. सॅम करण ५२ धावा करुन बाद झाला. दीपक चहर शून्य धावा करुन तर शार्दुल ठाकूर ११ धावा करुन बाद झाला. इमरान ताहिर १३ धावा करुन नाबाद राहिला.

मुंबई इंडियन्सकडून ट्रेंच बोल्टने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत ४ विकेट घेतल्या. राहुल चहरने ४ ओव्हरमध्ये २२ धावा देऊन २ विकेट घेतल्या. जसप्रित बुमराहने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देऊन २ विकेट घेतल्या. नॅथन कूल्टर नाईलने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देऊन १ विकेट घेतली. कृणाल पांड्याने ३ ओव्हरमध्ये १६ तर पोलार्डने एक ओव्हर टाकून ४ धावा दिल्या.

मुंबई कडून क्विंटन डी कॉकसोबत सलामीला इशान किशन आला आणि त्या दोघांनीच मुंबईला १० विकेट राखून विजय मिळवून दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत