Power outages in Mumbai suburbs
मुंबई

मुंबई उपनगरांमध्ये पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे खंडित झालेला वीजपुरवठा टप्प्या टप्प्यानं पूर्ववत

मुंबईमध्ये आज (सोमवार) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला […]

Mumbai beat Delhi by 5 wickets
क्रीडा

IPL 2020 : मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून केली मात, मुंबई अव्वल स्थानी

IPL 2020 : गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठी झालेल्या संघर्षात मुंबईकर दिल्लीच्या संघावर भारी पडले. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकांमधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे ७ सामन्यांत १० गुण असले तरी मुंबई नेट रनरेटच्या बळावर ‘नंबर […]

sushant singh rajput
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले फेक अकाऊंटस्; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला […]

Shiv Sena, Congress, BJP
राजकारण

मुंबई मनपात तिरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, भाजपची टक्कर

मुबई : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुका आता टप्प्याटप्प्याने होण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक  होत आहे. निवडणुकीत शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसणार आहे. मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व […]

Justice is done on Krishnakunj
महाराष्ट्र मुंबई

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच, मनसे व्यक्त केला आनंद

मुंबई : डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान […]

Lyricist Abhilash
मनोरंजन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गीतकार अभिलाष यांनी १९८५ मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी लिहीलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देना […]

sushant singh rajput
मनोरंजन

सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण

मुंबईः सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल आज एम्सच्या डॉक्टरांच्या टीमसमोर सादर होण्याची शक्यता आहे. पण हा अहवाल सादर होण्याआधीच सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. व्हिसेरा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली गेली नाही. मुंबईतील फॉरेंसिकच्या प्रयोगशाळेने सुशांत प्रकरणात नमुने मिळवण्यात तसेच त्यांचे अहवाल करण्यात जास्त वेळ खर्ची पडल्याचे मान्य केले तसेच व्हिसेराचा पुरेसा […]

maratha reservation
पुणे महाराष्ट्र मुंबई

मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार

कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे […]

housing minister Jitendra Awhad
मुंबई

म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी भेट

मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. […]

Drugs Case Arrest KJ
देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

नार्कोटिक्स ब्युरोचे गोवा आणि मुंबई येथे छापे; ६ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Bureau) शनिवारी मुंबई आणि गोवा येथे रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी करमजीत सिंह आनंद या नावाच्या एका तरुणाला ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भात अटक करण्यात आली. आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात […]