supreme court
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : राज्य शासनाच्या घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकरच निर्णय

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सांगितल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० […]

school education minister varsha gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]

teachers and non-teaching staff in schools
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचा निर्णय

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत […]

Pankaja Munde
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे, महादेव जानकर, रमेश कराड यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल

बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन […]

Ajit Pawar
महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते काही दिवसांपासून घरीच विलगीकरणात होते. आता त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुणीही काळजी करू […]

first installment of GST compensation
देश

जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी

नवी दिल्लीः  केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार थकवा जाणवत असल्याने क्वारंटाइन, परंतु काम सुरूच

उपमुख्यमंत्री अजित पवार थकवा जाणवत असल्याने राहत्या घऱी क्वारंटाइन झाले आहेत. मात्र ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. ते आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेत आहे. याशिवाय फाईल्स पुढे पाठवणे, कार्यालयीन कामं नियमित व सुरळीत सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित […]

Sanjay Raut
महाराष्ट्र

राज्यात सीबीआयला तपासबंदी करण्याचा निर्णय योग्यच – संजय राऊत

राज्यातील प्रकरणांच्या तपासास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ला असलेली सरसकट अनुमती मागे घेत राज्य सरकारने सीबीआयला तपासबंदी केली आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबत बुधवारी आदेश काढला. सीबीआय आता राज्यात सरकारच्या परवानगी शिवाय तपास करु शकणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. “मुंबई पोलिसांनी […]

Eknath Khadse join NCP
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील

मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]

masks
महाराष्ट्र

महाराष्ट्रात एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांत तर दोन व तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांत मिळणार

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या मास्कचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजवी दरात मास्क उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य झाले आहे. महाराष्ट्रात एन ९५ मास्क दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे […]