महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तोडफोड करु नका असे सक्त आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं […]
टॅग: maharashtra
कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं- अजित पवार
कराड : कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाहण्याचं […]
पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपे यांनी दिली मोठी माहिती…
मुंबई : लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी म्हटलें कि, लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात […]
तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या
जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी […]
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार आणि बोनस देणार – परिवहन मंत्री अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे. तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही लाट नाही तर त्सुनामी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाबत काळजी घेण्याविषयी सांगताना ते म्हणाले कि, कोरोनाची दुसरी लाट आली तर ती लाट नाही त्सुनामी असेल. उद्धव ठाकरे म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेंव्हाची […]
…तर फटाका व्यवसाय अडचणीत; ८० टक्के विक्री दिवाळीत
मुंबईः महाराष्ट्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशात सर्वाधिक फटाक्यांची विक्री मुंबईत होते. दरवर्षी देशात होणाऱ्या एकूण फटाका विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री मुंबईत होते. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घातल्यास ही विक्री होणार नाही आणि फटाक्यांची बाजारपेठ कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. फटाक्यांच्या विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळीत होते. दिवाळीत […]
रोबोट करणार कोविड निर्जंतुकीकरण, UV-360 सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन
कोविडचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. उदय सामंत म्हणाले कि, रुग्णालये, […]
महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग […]
फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे. “फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. […]










