deputy cm Ajit Pawar targeted BJP

कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं- अजित पवार

महाराष्ट्र राजकारण

कराड : कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी विरोधकांना नेहमी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असं अजित पवार यावेळी म्हणाले. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.

शिवसेना आमदार सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात ते म्हणाले की, ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात हा त्यांचा निर्णय असतो. वीज बिलासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. गेल्या सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे. कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. 29 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहीलं नाही. केंद्राने सर्व राज्यांना देश म्हणून समान वागणूक दिली पाहिजे, ती सध्या दिसत नाही. आपल्या पक्षाचे सरकार नाही म्हणून निधी देताना भेदभाव होतो, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत