protest from mns against increased electricity bill
महाराष्ट्र

मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चा, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले सक्त आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तोडफोड करु नका असे सक्त आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले.

  • वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने आज सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
  • पुण्यामध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास मनसेकडून शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्ही शनिवार वाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयकडे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार होतो. पण तुम्ही मोर्चा काढू दिला नाही. आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आला आहात, आता जोवर या ठिकाणी जिल्हाधिकारी इथे येऊन आमच निवेदन स्वीकारणार नाही. तोवर आमच ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. साडेबाराच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
  • ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये म्हणजेच अविनाश जाधव यांच्या नौपाड्यातील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
  • नवी मुंबईमध्ये बेलापूर, ऐरोलीमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग नोंदवला. बेलापूरमध्ये कोकण भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
  • नाशिकमध्येही राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मनसेने काढला. या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • औरंगाबादमध्येही मनसेच्या वीजबीलवाढीविरोधातील मोर्चाला शेकडोच्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत