Vitamin-C and zinc fail to save from corona
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष

व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल ​​चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]

home minister Anil Deshmukh
कोरोना महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी […]

Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local
महाराष्ट्र मुंबई

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]

Approval of the use of another vaccine by the British government
ग्लोबल

ब्रिटीश सरकारकडून आणखी एका लशीच्या वापराला मान्यता, ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली असली तरी आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड – एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्नानंतर आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात या लशीचा वापर सुरु केला जाणार आहे. ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या […]

Infiltration of a new strain of coronavirus in India
देश

चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]

Night curfew in the state from tomorrow, important instructions given by the Chief Minister
महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून […]

The US ranks behind us in corona tests - Arvind Kejriwal
देश

कोरोना चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. “आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या,” असा दावा केजरीवाल यांनी केला. दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारनं परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. ऑक्टोबर […]

dies during corona vaccine
कोरोना देश

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस

नवी दिल्ली : मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने […]

In the UK, corona vaccination has worsened the condition of the two
ग्लोबल

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडली, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ निर्देश

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लसीचे साइड इफेक्ट झालेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, या लसीमुळे झालेले दुष्परिणाम एलर्जीमुळे झाले आहेत. यानंतर ब्रिटनच्या आरोग्य विभागाने निर्देश दिले कि, ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर […]

Actress Kriti Senon infected with corona
मनोरंजन

अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण

अभिनेत्री क्रिती सेनॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. क्रिती मागील आठवड्यात चंडीगडमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीने सोमवारीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. पण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.