दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. “आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या,” असा दावा केजरीवाल यांनी केला.
दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारनं परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.
केजरीवाल यांनी सांगितलं कि, आम्ही दररोज ९० हजार चाचण्या करत आहोत. ही संख्या देशातीलच नाही, तर अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. १० लाख लोकसंख्येमागे ४५०० चाचण्या केल्या जात आहेत. देशाच्या आणि जगाच्या तुलनेत दिल्लीत दररोज सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर येतो,” असा दावा केजरीवाल यांनी केला.
With the efforts of the people of Delhi, we have effectively and successfully surpassed the third wave of Corona. Sharing some latest figures | LIVE https://t.co/5srdpYAKDE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 19, 2020