Former spokesperson of Rashtriya Swayamsevak Sangh M. G. Vaidya

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांचं निधन

महाराष्ट्र

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.

मा गो वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले.खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत