19 people including mahants of Pohardevi infected with corona
महाराष्ट्र

पोहरादेवी येथील महंतांसह 19 जणांना कोरोनाची लागण, ‘त्या’ हजारो जणांचं काय होणार?

वाशिम : पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणहून हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. येथे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. या गर्दीतून कोरोना संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. आता पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना […]

colleges
महाराष्ट्र मुंबई

मुंबई व उपनगरातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

मुंबई : राज्यातील महाविद्यालये उद्या (15 फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय देईल, असं शासन निर्णयात सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा […]

Corona infection changed the color of breast milk
कोरोना ग्लोबल

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे बदलला आईच्या दूधाचा रंग, नवीन बाब आली समोर

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आईच्या दूधाचा रंग हिरवा झाला. ही घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. याबद्दल तज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर दूधाचा रंग पु्न्हा सामान्य झाला, असा दावा अॅना कॉर्टेज या महिलेने केला. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल बोलताना सांगितले कि, कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीरात अॅण्टीबॉडीज तयार झाल्यामुळे दूधाचा रंग बदलला असावा. तसेच, हिरव्या […]

Decision to cancel Maghi Yatra of Pandharpur
महाराष्ट्र

पंढरपूरची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय

कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. २२ आणि २३ फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट […]

home minister Anil Deshmukh
कोरोना महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी […]

Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local
महाराष्ट्र मुंबई

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]

Center issues new guidelines on corona
कोरोना देश

मोठी बातमी : कोरोनासंदर्भात केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या कशाला मिळणार परवानगी

गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोनासंदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की, आता अधिक आसनक्षमता असणारी सिनेमा हॉल आणि थिएटर्स उघडली जातील. पूर्वी ते फक्त 50% क्षमतेसह उघडता येऊ शकत होते. याशिवाय आता सर्वांना जलतरण तलावात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी केवळ खेळाडूंना त्याचा वापर करण्याची परवानगी होती. गाईडलाईन्सचे महत्त्वपूर्ण मुद्दे : सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील […]

Approval of the use of another vaccine by the British government
ग्लोबल

ब्रिटीश सरकारकडून आणखी एका लशीच्या वापराला मान्यता, ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली असली तरी आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड – एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्नानंतर आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात या लशीचा वापर सुरु केला जाणार आहे. ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या […]

A new strain of corona virus was found in 20 passengers returning to India from Britain
देश

ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये आढळला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन

ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांपैंकी अनेक जण बेपत्ता असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. आत्तापर्यंत ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. मंगळवारी ही संख्या ६ वर होती. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात ब्रिटनहून जवळपास ३३ हजार प्रवाशी भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबादच्या लॅबमध्ये […]

Infiltration of a new strain of coronavirus in India
देश

चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]