Corona infection changed the color of breast milk

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे बदलला आईच्या दूधाचा रंग, नवीन बाब आली समोर

कोरोना ग्लोबल

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आईच्या दूधाचा रंग हिरवा झाला. ही घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. याबद्दल तज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर दूधाचा रंग पु्न्हा सामान्य झाला, असा दावा अॅना कॉर्टेज या महिलेने केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल बोलताना सांगितले कि, कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीरात अॅण्टीबॉडीज तयार झाल्यामुळे दूधाचा रंग बदलला असावा. तसेच, हिरव्या भाज्या, औषधांमुळेही दूधाचा रंग बदलला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, या दूधामुळे बाळाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या महिलेने सांगितले की, कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येण्याच्या चारदिवस आधी दूधाचा रंग बदलला होता. त्याशिवाय दूधाचे प्रमाणही कमी झाले. पंपच्या मदतीने तिने दूध फ्रीजरमध्ये ठेवले. फ्रीजरमधून दूध बाहेर काढल्यानंतर दूधाचा रंग बदलला असल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग झाला, त्यातच दूधाचा रंग हिरवाच दिसत होता. त्यामुळे अधिकच चिंता वाढली.

सोशल मीडियावर ही बाब मांडल्यानंतर काही महिलांनी त्यांना असाच अनुभव आला असल्याचे सांगितले. कोरोनाची बाधा झाली असताना बाळाला पाजण्याबाबतही भीती होती. डॉक्टरांनी सांगितले की, आईच्या दूधाच्या मदतीने बाळ विषाणूसोबत लढू शकतं. संसर्गामुळे स्तनपान थांबवू नका अशी सूचना डॉक्टरांनी केली होती. आईच्या दूधामुळे अनेक आजारांविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळते. आईच्या दूधामुळे मुलांच्या शरीरात अॅण्टीबॉडीज वाढतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत