पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी सुरुवातीच्या लक्षणांनंतर कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष मॅक्रो हे पुढील सात दिवस विलगीकरणात राहतील. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं असलं तरी ते आपले काम सुरू ठेवतील. ते आयसोलेशनमध्ये असले तरीही आपल्या कामावर मात्र त्यांची नजर असणार आहे.
फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची आतापर्यंत २४,०९,०६२ लोकांना लागण झाली आहे. तर ५९,३६१ लोकांचा मृत्यू झाला आहे.