मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली कि माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. गेल्या वर्षी १२ जून या दिवशी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा करोनाची लागण झाली होती. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 23, 2021
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हणतात, ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.




