मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे. हंसल मेहता […]
टॅग: coronavirus
भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी विलगीकरणात, भुवनेश्वरच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु
मेरठ : भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते दोघेही विलगीकरणात राहत आहेत. मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. तथापि, 21 मे रोजी भुवनेश्वरच्या आईचा […]
महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच विलगीकरणात राहावं लागणार, म्युकरमायकोसिस नोटीफाईड आजार घोषित
मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]
बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, स्वतःची पाठ थोपटत डॉक्टरांबद्दल हीन दर्जाची टीका
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना. व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा […]
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील एकमेव कोरोना चाचणी लॅब उद्धवस्त
गाझा : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान असलेला तणाव चिघळत चालला आहे. हमासकडून रॉकेट हल्ले सुरु असून इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा उद्धवस्त झाली आहे. या हल्ल्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. इस्रायलच्या हल्ल्यात कोरोना चाचणी प्रयोग शाळा […]
10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर एक महिन्याच्या बाळाने हरवलं कोरोनाला, डॉक्टर म्हणाले…
भुबनेश्वर : ओडिशा येथील भुबनेश्वरमध्ये मागील महिन्यात जन्मलेल्या एका मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या बाळाला जगन्नाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती केवळ एक महिन्याची होती, जेव्हा तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. या नवजात बाळावर उपचार करणार्या नवजाततज्ज्ञ डॉ. अर्जित मोहपात्रा यांनी माहिती […]
चोरीच्या उद्देशानं घरात घुसले, विलगीकरणात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार
इंदौर : चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला विलगीकरणात राहत होती. नराधमांनी 50 हजार रुपये आणि मोबाईल तर चोरलाच पण या महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथे घडली आहे. […]
टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली…
नवी दिल्ली : टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे गुरुवारी (13 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे गुरुवारी रात्री ९.३५ वाजता निधन झाले. इंदू जैन आजीवन अध्यात्मिक साधक, अग्रणी समाजसेवा करणाऱ्या, कलेच्या संरक्षक आणि महिला हक्कांच्या समर्थक राहिल्या. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असून अनेक […]
देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी असलेल्या मदत योजनेत मोठा घोटाळा
पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य सरकारी आर्थिक मदत देण्याची जी योजना आहे, या योजनेत सामान्य महिलांची नोंदणी करून राज्य सरकारची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम घेऊन अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण
हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही. कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी […]










