नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना.
व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा रामदेव म्हणत आहेत कि, “कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही 1000 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. जर स्वत: ला वाचवू शकले नाहीत तर त्यांची डॉक्टरी काय कामाची? असे म्हणत त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडवली असून कोरोना लसीच्या प्रभावीपणाची देखील थट्टा केली आहे. तसेच त्यांनी स्वतःची पाठ थोपटत ते स्वतः “देवत्व” आणि “सन्मान” असलेले डॉक्टर असल्याचा दावाही केला आहे.”
पुढे बाबा रामदेव म्हणाले कि, “जर तुम्हाला डॉक्टर बनायचे असेल तर स्वामी रामदेवसारखे बना, ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही, पण ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवीविना, देवत्व आणि सन्मान असलेला मी एक डॉक्टर आहे.”
Nothing more needs to be said
Nothing more needs to be heard
He is an insult to any religion. At least let him drop the ‘Swami’ prefix
He is as far removed from “divinity” as one could be.#Ramdev #Doctors @drharshvardhan @MoHFW_INDIA @PMOIndia pic.twitter.com/COH9f1Ztm4— Dr Ambrish Mithal (@DrAmbrishMithal) May 24, 2021
खरं तर, गेल्या आठवड्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले होते की कोरोनाविरुद्धच्या दुसर्या लाटेमुळे देशभरातील २44 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला. परंतु यापैकी केवळ सात डॉक्टरांना कोरोनाचे दोनही डोस देण्यात आले होते.
बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध
‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन




