Bhuvneshwar Kumar And His Wife in Quarantine After COVID-19 Symptoms
क्रीडा

भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी विलगीकरणात, भुवनेश्वरच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु

मेरठ : भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते दोघेही विलगीकरणात राहत आहेत. मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तथापि, 21 मे रोजी भुवनेश्वरच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सर्वांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती. पण कुटुंबातील इतर जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता भुवनेश्वर आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत.

गेल्याच महिन्यात भुवनेश्वरचे वडील किरण पाल सिंह यांचे निधन झाले होते.

ब्रेकिंग : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत