मुंबई : एका मॉडेलने बॉलिवूडमधील नऊ जणांविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यात अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मॉडेलच्या आरोपानुसार, ती मुंबईमध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी आली होती. २०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात अनेक वेळा तिचा शारीरिक छळ आणि विनयभंग करण्यात आला. सिनेमात काम देण्याच्या नावाखाली तिची फसवणक करत ने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे इथं या मॉडलचं शोषण केल्याचं एअआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर निखिल कामतने सांताक्रूजमधील एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केला. मॉडलने दाखल केलेल्या गुन्ह्यात इतर लोकांमध्ये टी-सीरीज चे कृष्ण कुमार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचे सह-संस्थापक अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजित ठाकुर, गुरुज्योत सिंह आणि ‘थलाइवी’ चे निर्माता विष्णु वर्धन इंदुरी यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक
‘टार्झन’चा अंत! अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसह अन्य सहा जण ठार
दरम्यान, निर्माता अजित ठाकूर यांनी या मॉडेलने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की मॉडेलने केलेले सर्व आरोप निराधार आहेत. बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.