times group chairperson indu jain died due to coronavirus

टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली…

कोरोना देश

नवी दिल्ली : टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे गुरुवारी (13 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे गुरुवारी रात्री ९.३५ वाजता निधन झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंदू जैन आजीवन अध्यात्मिक साधक, अग्रणी समाजसेवा करणाऱ्या, कलेच्या संरक्षक आणि महिला हक्कांच्या समर्थक राहिल्या. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असून अनेक राजकारणी, उद्योगपती आणि अध्यात्मिक स्वामींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे मित्र आणि प्रशंसक त्यांच्या बद्दल भरभरून बोलत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हटले कि, “टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती इंदू जैन जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्या त्यांच्या समाजसेवा उपक्रमांबद्दल, भारताच्या प्रगतीबद्दलची त्यांची उत्कटता आणि त्यांची आपल्या संस्कृतीत असलेली खोल रुची या गोष्टींसाठी नेहमी स्मरणात राहतील. मला त्यांच्याबरोबरच्या झालेल्या भेटी आठवतात. त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना आहेत. ओम शांती.”

इंदू जैन यांनी सन 2000 मध्ये सतत विकास आणि परिवर्तनात्मक बदल या उद्दीष्टाने टाइम्स फाऊंडेशनची स्थापना केली. त्या त्या अध्यक्षा होत्या. ही भारतातील एक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था आहे जी सामुदायिक सेवा पुरवते. हे फाउंडेशन भूकंप, पूर, चक्रीवादळ आणि साथीच्या रोगांसारख्या आपत्ती निवारण कार्यांसाठी सामुदायिक सेवा आणि टाईम्स रिलीफ फंड चालविते.

महिला उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी 1983 मध्ये स्थापन झालेल्या FICCI लेडीज ऑर्गनायझेशनच्या (एफएलओ) इंदू जैन संस्थापक अध्यक्ष होत्या. 1999 पासून त्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्षा राहिल्या. ह्या ट्रस्टची स्थापना १९४४ साली त्यांचे सासरे साहू शांती प्रसाद जैन यांनी भारतीय भाषांना चालना देण्यासाठी स्थापित केला होता. ह्या ट्रस्टद्वारे प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. केंद्र सरकारने जानेवारी 2016 मध्ये इंदू जैन यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत