50 employees of Bharat Biotech test COVID-19 positive
देश

‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी केली होती, त्याचा संदर्भ देत एला यांनी बुधवारी ट्विट केले की, “काही राज्यांनी आमच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करून आम्हाला खूप निराश केले. आमचे ५० कर्मचारी कोविडमुळे काम करू शकत नाहीयेत, तरीही आम्ही कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये २४ तास तुमच्यासाठी काम करत आहोत. ”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत