Bharat Biotech completes clinical trial for nasal Covid-19 vaccine
कोरोना देश

मोठी बातमी! भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण

Nasal Covid-19 Vaccine : भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ कृष्णा एला म्हणाले की, त्यांनी जगातील पहिल्या वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झालेल्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. “डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. सर्वकाही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल आणि ही जगातील पहिली नैदानिकदृष्ट्या सिद्ध झालेली […]

50 employees of Bharat Biotech test COVID-19 positive
देश

‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही. कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी […]

dcgi approves trial of covaxin on 2 to 18 years age in the country start soon
कोरोना देश

मोठी बातमी : २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल, DCGI ने दिली मंजुरी

नवी दिल्ली : भारताने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱ्या कोरोना लसीच्या ट्रायलला आज मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. भारत बायोटेक लवकरच आपल्या कोव्हॅक्सिन […]

Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved
देश

मोठी बातमी : भारताची ‘ही’ कोरोना लस कोरोनाच्या ६१७ प्रजातीवर गुणकारी

नवी दिल्ली : भारतीय लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 व्हॅरिएंटवर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना कोवॅक्सिन लस 617 प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा […]

Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved
देश

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’लाही मिळाली आपत्कालीन वापरास मंजुरी

केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे. ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ […]

even if taking corona vaccine anil vij infected with corona bharat biotech clarifies
देश

कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण.. भारत बायोटेकनं सांगितलं कारण

चंदीगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी डोस घेतला होता. तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बायोटेकने याबाबत ट्वीट करत माहिती […]

Prime Minister Modi
देश

पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]