dcgi approves trial of covaxin on 2 to 18 years age in the country start soon
कोरोना देश

मोठी बातमी : २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल, DCGI ने दिली मंजुरी

नवी दिल्ली : भारताने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱ्या कोरोना लसीच्या ट्रायलला आज मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. भारत बायोटेक लवकरच आपल्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीची ट्रायल 525 निरोगी स्वयंसेवकांवर करणार आहे. दरम्यान, पहिल्या आणि दुसर्‍या लसीचा डोस 28 दिवसांच्या अंतराने दिला जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२ ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीचे मूल्यांकन करण्याची परवानगी हैदराबाद येथील भारत बायोटेकने मागितली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) भारत बायोटेकच्या अर्जावर व्यापक चर्चेनंतर चाचणीला मान्यता दिली. तथापि, SEC ने एक अट ठेवली आहे की तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यापूर्वी भारत बायोटेक फेज II च्या क्लिनिकल ट्रायलच्या सुरक्षेचा अंतरिम डेटा CDSCO ला प्रदान करेल.

भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सहकार्याने कोव्हॅक्सिन लस विकसित केली आहे. कंपनी त्याचे उत्पादन आणि विपणनही करीत आहे. भारतात, लसीकरण मोहिमांमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड बरोबरच कोव्हॅक्सिनचा वापरही केला जात आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट चालू आहे. या लाटेने देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेकजणांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत तज्ञांनी असा इशारा दिला आहे की भारतात कोरोनाची तिसरी लाटही येणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होईल. या इशाऱ्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत प्रश्न विचारला. अनेक राज्य सरकारांनी आधीच मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, सर्व आशा लसीवरच अवलंबून आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत