covid 19 virus enters in erectile cells of penis causes erectile dysfunction

कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुरुषांच्या गुप्तांगावर कब्जा करतोय कोरोना विषाणू, संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती

कोरोना तब्येत पाणी

पुरुषांना कोरोनामधून बरे झाल्यानंतर देखील कोरोना विषाणू धोका पोहोचवत असल्याचं समोर आलं आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पुरुष बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात जाऊन तेथे राहत आहे. ज्यामुळे पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन (स्तंभन दोष) झाल्याचं अनुभवत आहेत. कोरोना विषाणू पुरुषांच्या लिंगात उपस्थित इरेक्टाइल पेशींवर कब्जा करत आहे. याचा गंभीर परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मियामी विद्यापीठाच्या (Miami University) शास्त्रज्ञांनी कोरोनातून बरे झालेल्या दोन पुरुषांचे लिंग स्कॅन केले. त्यांना कोरोनातून बरे होऊन 6 महिने झाले होते, त्यानंतर हे स्कॅनिंग केले गेले. यावेळी कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात उपस्थित इरेक्टाइल पेशींच्या आत उपस्थित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. ज्यामुळे या पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, त्यातील एका व्यक्तीस गंभीर कोरोना संसर्ग झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन तो बरा झाला होता, तर दुसर्‍याला सौम्य कोरोना संसर्ग होता. परंतु या दोघांनाही ही समस्या भेडसावत. तज्ञांचे म्हणणे आहे की पुरुषांच्या लिंगात कोरोना विषाणू कॅप्चर झाल्याचे प्रथमच उघड झाले आहे. हे एक धोकादायक लक्षण आहे.

कोरोना विषाणूमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होत आहे, हे अगोदरच समोर आलेले आहे. त्यातच तो शरीरात उपस्थित असलेल्या अवयवांना खराब करत आहे. जर त्याने पुरुषांच्या लिंगामध्ये रक्तवहन थांबविले, तर ते कधीही संभोग करू शकणार नाहीत. डॉ. रंजीत रामासामी यांनी दोन्ही पुरुषांच्या लिंगांचे अगदी खोल स्कॅनिंग केले. त्यांच्या कोशिकांचे फोटो 100 नॅनोमीटर इतक्या खोल पातळीवर घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या उतींमध्ये कोरोना विषाणू दिसला. याशिवाय त्यांची PCR चाचणीही घेण्यात आली. बरे झाल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. डॉ. रंजीत आणि त्यांच्या टीमने सांगितले की या विषाणूपासून बचाव करण्याचे केवळ दोन मार्ग आहेत. एकतर लस आणि दुसरे प्रोटोकॉल पाळणे.

संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोनाव्हायरस एंडोथेलियममध्ये सूज निर्माण. हा माणसाच्या रक्तवाहिन्यांच्या आतील थर असतो. हा संपूर्ण शरीरात असतो. पुरुषांच्या गुप्तांगात रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ह्या खूपच लहान आणि पातळ असतात. अशा परिस्थितीत जर सूज निर्माण झाली तर रक्तपुरवठा खंडित होतो. याचा परिणाम त्यांच्या लैंगिक वर्तनावर होतो.

दोन महिन्यांपूर्वी रोम विद्यापीठातून असाच एक अभ्यास समोर आला आहे. रोम विद्यापीठातील डॉक्टरांनी 100 पुरुषांच्या प्रजननक्षमतेची तपासणी केली. यापैकी 28 टक्के पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दिसून आली. रोम विद्यापीठातील डॉक्टरांनी 100 लोकांशी संवाद साधला. त्यांचे सरासरी वय 33 वर्षे होते. यापैकी 28 जणांना ही समस्या भेडसावत होती. ज्यांना कोरोना नाही, अशा केवळ 9 टक्के लोकांना ही समस्या होती. याचा अर्थ कोरोना संक्रमित पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या सामान्य पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त होते. हा अभ्यास अँड्रॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत