पुणे : पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट कडून लस तयार करण्यात येत आहे. मात्र, आता या सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआयने नोटीस बजावली आहे. कोविड लसीची सुरू असलेली चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या आहेत. मात्र, तिसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांना दिलेल्या लसीचे साईड इफेक्ट्स जाणवल्याने ऑक्सफर्डने आपली लसीची चाचणी थांबवली
सीरम इंस्टिट्यूटने म्हटलं, “ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांबाबत आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. पण भारतात सुरू असलेल्या चाचण्या सुरूच राहतील. त्यात कोणतीही समस्या समोर आलेली नाहीये”.
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटने कोरोनावर लस निर्मितीचे काम सुरू केले आहे. या लस निर्मितीच्या कामात सीरम इन्स्टिट्यूट अस्ट्रोजेनकासोबत मिळून या लसीचे १०० मिलियन डोस तयार करणार आहे. भारतात ही लस ‘कोविशील्ड’ नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादक कंपनी लॉन्च करणार आहे.




