Rahul Gandhi targeted Prime Minister Modi
देश राजकारण

लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब, शिल्लक आहेत फक्त…

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या तुटवड्यावर भाष्य केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले कि, “लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब झाले आहेत. आता शिल्लक आहेत ते फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर जीएसटी आणि इकडे – तिकडे पंतप्रधानांचे फोटो.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत