मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे.
हंसल मेहता यांनी लिहिले कि, “मला नेहमी वाटायचे की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळ जगाल. पण, ती माझी चूक होती. मी तुम्हाला तिकडे भेटेन पप्पा. जगातील सर्वात देखणा माणूस. मला आजपर्यंत भेटलेला सर्वात शांत आणि दयाळू व्यक्ती. तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल तुमचे आभार. धन्यवाद लेजंड, माझा हिरो.”
काही दिवसांपूर्वी हंसल मेहता यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. ते सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात.




