Union Minister Pratap Sarangi
कोरोना देश

देशातील सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल – केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी

देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित करताना भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया […]

Sanjay Raut
देश महाराष्ट्र

हे मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं वक्तव्य – संजय राऊत

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजपानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. भाजपानं करोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली, याच मुद्यावरून भाजपावर जोरदार टीका होत असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले कि, “जिथे जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे करोनाची लस […]

WHO
कोरोना ग्लोबल

या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता- WHO

जगभरात सध्या सर्वजण कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा […]

Sharad Pawa
कोरोना महाराष्ट्र

कोरोनावर लस कधीपर्यंत येईल हे शरद पवारांनी केले स्पष्ट…

पुणे : कोरोनावर लस कधी येणार?. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे ती कधी पर्यंत येणार?. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम […]

Corona Vaccine
कोरोना देश

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]

Corona Vaccine update
कोरोना

कोरोना लस – सीरम इंस्टिट्यूटला DCGIची नोटीस

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट कडून लस तयार करण्यात येत आहे. मात्र, आता या सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआयने नोटीस बजावली आहे. कोविड लसीची सुरू असलेली चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या […]

ग्लोबल

मोठी बातमी: जगातील पहिल्या कोरोना लसीची रशियाने केली नोंद

कोरोना व्हायरसवरील पहिली लस तयार झाली असून ती आज लाँच करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज असा दावा केला आहे. ते पुढे असंही म्हणाले की, मला माहित आहे की, ही लस प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणारी आहे. ही लस रशिया सरकारच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. ही जगातील पहिली लस […]

कोरोना ग्लोबल

१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार

जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं […]

कोरोना

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मिळेल कोरोनाची लस, सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत

करोना संकटातून फक्त त्यावरची लस बाहेर काढू शकते. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना […]