Sharad Pawa

कोरोनावर लस कधीपर्यंत येईल हे शरद पवारांनी केले स्पष्ट…

कोरोना महाराष्ट्र

पुणे : कोरोनावर लस कधी येणार?. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे ती कधी पर्यंत येणार?. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषधं नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल असं मला त्यांनी सांगितलंय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. मी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जातो कारण पुनावाला माझे मित्र आहेत. तसेच लसीची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय हे समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

1 thought on “कोरोनावर लस कधीपर्यंत येईल हे शरद पवारांनी केले स्पष्ट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत