Corona Vaccine
कोरोना देश

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर कुणाला लसीवर विश्वास नसेल तर या लसीचा पहिला डोस मी घेईन. जैव तंत्रज्ञान विभाग आणि आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद हे लसीच्या चाचणीला पाठिंबा देण्यासाठी सक्रीयपणे कार्यरत आहेत. भारतात विविध प्रयोगशाळांमध्ये लसींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चाचण्या सुरू आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत