नवी दिल्ली : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी एका माहितीच्या आधारे दहशतवादी समजून एका वाहनावर गोळीबार केला. पण या वाहनात दहशतवादी नव्हते, तर कोळसा खाणीत काम करणारे मजूर असल्याचं गोळीबारानंतर लक्षात आलं. या गोळीबारात १३ मजूर ठार झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलांची वाहनं पेटवून दिली. या घटनेत १ जवान ठार झाला. […]
टॅग: पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारने घेतला तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय, पंतप्रधान म्हणाले – चांगल्या हेतूने कायदे आणले, पण…
शेतकऱ्यांच्या हट्टापुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने हा कायदा चांगल्या हेतूने आणला, मात्र काही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही अत्यंत नम्रतेने […]
मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई : मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले की, प्रस्तावित मुंबई ते […]
ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले […]
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 9 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार, अशाप्रकारे तपासा आपले नाव…
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 8 हप्ते मिळाले आहेत. आता 9 वा हप्ता 9 ऑगस्टला रिलीज होईल. MyGovIndia च्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत 2000 […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. Rajya Sabha MP […]
मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच हा महागाई भत्ता तीन टप्प्यांत मिळून ११ टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच […]
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते? जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात मोठे बदल दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कार्मिक, पेन्शन आणि नागरी तक्रारी खात्यासह ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर लक्ष ठेवतील. तर अमित शहांकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात […]
उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस, नवे नियम आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…
नवी दिल्ली : उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून रोजी ही घोषणा केली होती. आता तुम्हाला शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार आहे. यासह आरोग्य मंत्रालयानेही लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या उद्यापासून लागू होणार आहेत. राज्यांना आता कशाप्रकारे लस मिळेल? राज्यांना त्यांची लोकसंख्या, […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘ते’ 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार […]










