नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.
Rajya Sabha MP Shri Sharad Pawar met PM @narendramodi. @PawarSpeaks pic.twitter.com/INj26CLl0k
— PMO India (@PMOIndia) July 17, 2021
दरम्यान, काल शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीत अजून एक माजी संरक्षण मंत्री ए के अँटोनी देखील उपस्थित होते. या भेटीत देशातील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित मुद्दे तसेच सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील मुद्यांवर चर्चा झाली.




