Mumbai High Court
देश

मुंबई उच्च न्यायालयाने गुलशन कुमार हत्याप्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये माफी मिळण्यास आरोपी पात्र नसल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने गुलशन कुमार यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संगीतकार गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट, १९९७ रोजी जुहूमधील जीतनगर येथील मंदिरातून बाहेर येताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. २००२ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला दोषी ठरविण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. काही दिवसानंतर संगीतकार नदीम अख्तर सैफी हे या प्रकरणात सह-सूत्रधार असल्याचे समोर आले होते. टिप्स कॅसेटचे मालक रमेश तोरानी यांना देखील हत्येप्रकरणी अटक केली होती.

२००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केला तेव्हा अब्दुल रौफ बांगलादेशात पळून गेला होता. परंतु, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बांगलादेशात प्रवेश केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर बांगलादेशने त्याला भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले की शिक्षेदरम्यान मिळालेली पॅरोल तोडून पळून जात आरोपीने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या. त्यामुळे आरोपी कोणत्याही माफीच्या लायक नाही. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठानं हा निकाल जाहीर केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत