Amit Shah

नागालँड गोळीबार प्रकरणाचे संसदेत पडसाद, अमित शहा देणार स्पष्टीकरण

देश

नवी दिल्ली : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी एका माहितीच्या आधारे दहशतवादी समजून एका वाहनावर गोळीबार केला. पण या वाहनात दहशतवादी नव्हते, तर कोळसा खाणीत काम करणारे मजूर असल्याचं गोळीबारानंतर लक्षात आलं. या गोळीबारात १३ मजूर ठार झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलांची वाहनं पेटवून दिली. या घटनेत १ जवान ठार झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचा निषेध करत चौकशीचे आदेश दिले. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनीही एसआयटी नेमली आहे. दुसरीकडे, लष्कराने कोर्ट ऑप इन्क्वॉयरीचे आदेश दिले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, नागालँडमधील गोळीबाराचे पडसाद आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्यसभेत करत गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. नागालँडमधील गोळीबाराची घटना हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे. ही घटना दुर्दैवी आहे. ती कशी काय घडली? या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक बोलावली असून यात नागालँडमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरही चर्चेची शक्यता आहे. नागालँडमधील गोळीबाराच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन देणार आहेत, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. नागालँड गोळीबाराच्या घटनेप्रकरणी एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चर्चेची मागणी करत लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत