नवी दिल्ली : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी एका माहितीच्या आधारे दहशतवादी समजून एका वाहनावर गोळीबार केला. पण या वाहनात दहशतवादी नव्हते, तर कोळसा खाणीत काम करणारे मजूर असल्याचं गोळीबारानंतर लक्षात आलं. या गोळीबारात १३ मजूर ठार झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलांची वाहनं पेटवून दिली. या घटनेत १ जवान ठार झाला. […]

