नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 8 हप्ते मिळाले आहेत. आता 9 वा हप्ता 9 ऑगस्टला रिलीज होईल. MyGovIndia च्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते.
Hon’ble PM Shri @narendramodi will release the next instalment of PM-KISAN funds under the PM Kisan Samman Nidhi Yojana on 9th August 2021 at 11 AM.
Register for the event at: https://t.co/NNPhWg5KT1 #TransformingIndia pic.twitter.com/1nHOkmVI6k
— MyGovIndia (@mygovindia) August 3, 2021
पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी 8 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव तपासू शकतात. ही यादी pmkisan.gov.in पोर्टलवर अपलोड केली जाते, ज्यात पीएम किसान सन्मान निधी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत.
आपले नाव अशाप्रकारे तपासा :
- पंतप्रधान किसान सन्मान निधी PMkisan.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
- उजवीकडे ‘Farmers Corner’ दिसेल.
- ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’ चा पर्याय उपलब्ध असेल.
- ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) पर्यायावर क्लिक करा.
- येथे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक ड्रॉप डाऊन सूचीतून निवडा. गाव निवडा.
- आता Get Report वर क्लिक करा. आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येईल.
- ही यादी वर्णक्रमानुसार (अल्फाबेटिकल) असते. ही यादी अनेक पानांची असते. यात खालच्या बाजूला असलेला पर्याय वापरून पेज बदलून आपले नाव पाहू शकता.
- याद्वारे आपण पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता आपल्याला मिळणार की नाही याची खात्री करुन घेऊ शकता.
आपण पंतप्रधान किसान योजनेत नोंदणी केलेली असेल, तर आपण आपले स्टेटस PMkisan.gov.in वर तपासू शकता.




