A huge fire broke out in the head office of Punjab National Bank in kolkata

पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात भीषण आग

देश

कोलकाता : कोलकाता शहरातील स्ट्रँड रोड वरील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या हेरिटेज बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य केले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बँकेची कॅन्टीन असलेल्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी आठच्या सुमारास पहिल्यांदा आग लागल्याचं निदर्शनास आलं.
त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या इमारतीत लागलेली आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत