Appreciation of India from WHO

WHO कडून भारतावर कौतुकाचा वर्षाव

ग्लोबल देश

कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील अनेक देशांना वॅक्सिन पुरवण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच शेजारी देशांनाही भारताकडून मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचा पुरवठा झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेबरेयेसस यांनी भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यात आपली स्थिती हळू हळू बळकट होत आहे. त्यांनी मदतीसाठी मोदींचे आभार प्रकट केले. एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण केली तरच कोरोना संकटाचा मुकाबला करुन जास्तीत जास्त प्राण वाचवता येतील, असेही टेड्रोस घेबरेयेसस म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत