पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पाश्चात आई ,वडील , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीयरची […]
टॅग: पुणे
सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या
मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी […]
धक्कादायक : टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादातून १३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली परिसरात घडली आहे. आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास […]
सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत
पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]
पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]
पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दौंड : बोरी भडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील त्रिमुर्ती हॉटेलवर पोलिसांना छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यवत पोलिसांनी ही कारवाई केली असून मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना […]
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आग लावली कि लागली? जाणून घ्या…
पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. […]
धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे […]
महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना दिली खूशखबर
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना खूशखबर दिली आहे. आजपासून व्यायामशाळा खुल्या होणार आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपाहारगृहे, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी आठ ते रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, असे या आदेशामध्ये नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना किमान […]
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
पुणे : पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम […]










