दौंड : बोरी भडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील त्रिमुर्ती हॉटेलवर पोलिसांना छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यवत पोलिसांनी ही कारवाई केली असून मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने त्रिमुर्ती हॉटेलवर छापा टाकला.
बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडून खात्री केली. सेक्स रॅकेटची माहिती खरी ठरली. नंतर पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका केली. त्यापैकी एक महिला महाराष्ट्रीयन तर दोन महिला पश्चिम बंगालमधील आहेत.