Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. मुलीला फूस लावून अपहरण केल्याचे तिच्या आईवडिलांनी तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी सासवड येथे मुलगी सापडली. त्यावेळी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तात्काळ मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक चौघा आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. अन्य दोन आरोपींचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत